मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

सरल विद्यार्थी

सरल विद्यार्थी नवीन नाव नोंदणी




    घटक
 download
नवीन  विद्यार्थी नोंदणी  माहिती पुस्तिका pdf
नवीन  विद्यार्थी नोंदणी माझा व्हिडीओ
 आधार नोदणी पुस्तिका pdf
mdm new apps


नवीन नावनोंदणी कशी करावी

*New Student Data Entry using Excel(Off-line) is now available for all regions.*

*इय्यता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थांची सरल मध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे*. 
*दिनांक ३१/०८/२०१६ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.*
*एक्सेलद्वारे ( ऑफ- लाईन) नविन विद्यार्थी नोंदणी सर्व विभागांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे .*
🌷Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌷
 *Saral मध्ये नवीन विद्यार्थी माहिती भरण्यासंबंधी सूचना* 



*आता  आपल्याला SARAL प्रणाली मध्ये इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे*

*त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

➡ *सर्व प्रथम आपल्या कॉम्पुटर च्या Chrome browser च्या adress bar मध्ये www.education.maharashtra.gov.in  हि आपली सर्वांच्या परिचयाची SARAL WEBSITE चे नाव लिहा.*
➡ *त्यानंतर student या tab वर क्लिक करा.*
➡ *आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.*
➡ *वरच्या पट्टीवर अनेक tab आहेत त्यातील Excell या butten वर क्लिक करा.*
➡ *त्यातील Download Personal वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर इयत्ता निवडा*
➡ *Download file या butten वर क्लिक करा*
➡ *आपल्या computer च्या Downloads या भागात आपली download केलेली file जमा झालेली आहे*
➡ *इथे मात्र download होताना दोन file डाउनलोड होतात एक word ची आणि दुसरी Excell ची*
➡ *word च्या file मधल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्या*
➡ *आपल्याला जी माहिती भरायची आहे ती excell च्या sheet मध्ये भरायची आहे*
➡ *Word च्या file मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे Excell sheet मधील setting बदला*
➡ *File open झाल्यावर आपल्याला तीन tab दिसतील INSERT UPDATE DELETE*
➡ *त्यातील INSERT या tab वर क्लिक करा*
➡ *आपल्या समोर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरा*
➡ *SAVE या BUTTEN वर क्लिक करून SAVE करा*
➡ *पुन्हा update या butten वर क्लिक करून GENERAL REGISTER नंबर टाकून Get Data वर क्लिक करा, माहिती बरोबर असल्यास update वर क्लिक करा*
➡ *आता या file ला CSV COMMA DELIMETED मध्ये convert करा*
➡ *आपली हि file आता upload साठी तयार आहे.*
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
⏫⏫ *file upload करण्यासाठी*

➡ *पुन्हा Excell या टॅब वर जाऊन Upload Personal या टॅब वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर Browse वर क्लिक करा*
➡ *ज्या ठिकाणी आपल्या computer मध्ये file ठेवलेली आहे तिथे जाऊन open या butten वर क्लिक करा*
➡ *येथे मात्र upload च्या दोन steps आहेत दोन्ही steps पूर्ण करा*
➡ *Data upload succesfully messege आले कि समजा आपले काम झाले*

🚹 *या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL च्या पोर्टल मध्ये भरू शकता*


================================

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : 27/08/2016
(सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांना समजण्यासाठी सर्व ग्रुप मध्ये share करावी.)   

♦ *सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती student पोर्टल मध्ये कशी नोंदवावी याची सविस्तर माहिती*♦ 
✏सन २०१५-१६ या वर्षी पासून सरल मधील student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांची माहिती नोंदवली गेली असली तरी काही विध्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याचे राहून गेले होते.तसेच चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच सन २०१६-१७ ला शालेय प्रवाहात आलेले नविन विध्यार्थी आणि मागील वर्षामध्ये माहिती भरावयाचे राहून गेलेले विध्यार्थी यांची माहिती भरण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी खालील माहितीप्रमाणे सर्वांनी ज्या मुलांची माहिती अद्याप student पोर्टल मध्ये नोंदवलेली नाही अशा सर्व मुलांची माहिती नोंदवावी.

👉 *टीप* : सध्या शासनाच्या आदेशानुसार इयत्ता १ ली च्याच  मुलांचे नवीन entry म्हणून माहिती भरावयाची आहे.इतर इयत्तांचे विद्यार्थी जे मागील वर्षी सरल मध्ये नोंदले गेले नव्हते असे विद्यार्थी नोंदवण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे.ती सुविधा यथावकाश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

*student पोर्टल मध्ये आलेल्या कोणत्याही समस्या कळवण्यासाठीची लिंक* :
http://goo.gl/9vBAQ8

👉१) सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात घ्यावे की नविन विध्यार्थी नोंदणी ही offline पद्धतीने भरावयाची आहे.यासाठी मुख्याध्यापक login करावयाचे आहे.यासाठी www.student.maharashtra.gov.in  या website वर मुख्याध्यापक login करावयाचे आहे.त्यानंतर EXCEL या बटनावर क्लिक करून Download personal या बटनावर क्लिक करावे.

२) Download personal या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये ज्या वर्गाच्या मुलांची माहिती भरावयाची आहे तो वर्ग dropdown box मधून select करून घ्यावा.

यानंतर ११ वी आणि १२ वी वर्गासाठी stream म्हणजेच शाखा (उदा. कला,वाणिज्य,विज्ञान) ज्या शाखा आपल्या शाळेला लागू असेल ती शाखा निवडून घ्यावी आणि Download File या बटनावर क्लिक करावे.

३)Download File या बटनावर क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या वर्गाची एक excel file आणि एक  Readme file ही download करण्यासाठी उपलब्ध झालेली दिसून येईल.

*Readme file* :  ही word या प्रकारात open अथवा download करण्यासाठी उपलब्ध झालेली असेल.या मध्ये आपणास नविन विद्यार्थी add करण्यासाठी महत्वाची माहिती देऊन या फॉर्म मध्ये कशा प्रकारे काम करावे याची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे.

*Excel file* : ही file आपण select केलेल्या वर्गाची विद्यार्थी माहिती भरण्यासाठी excel या प्रकारात उपलब्ध करून देण्यात आलेली असेल.या file ला खालील प्रकारे open ऐवजी save file या बटनावर क्लिक करून शेवटी असलेल्या ok या बटनावर क्लिक करावे

४)ok या बटनावर क्लिक केल्यावर सदर excel file ही आपल्या computer मध्ये download होईल.अशा प्रकारे ज्या ज्या वर्गाची माहिती आपणास भरावयाची आहे अशा सर्व वर्गाची excel file download करून घ्यावयाची आहे याची नोंद घ्यावी.

५)सदर file ही computer मध्ये excel या प्रकारात save झालेली आपणास पहायला मिळेल.ही file save होताना MINI आणि त्यानंतर शाळेचा udise नंबर अशा नावाने save होते हे लक्षात घ्यावे.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की सदर file नाव हे कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत बदलावयाचे नाही आहे.नाव बदलून माहिती भरण्याचा प्रयत्न केल्यास फिले system द्वारे REJECT केली जाईल.

६)सदर excel file ही excel मधून open करावयाची आहे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

७)सदर file ही excel च्या 'Microsoft Office (Excel)' version च्या 2003, 2007, 2010 व 2013  प्रकारात open होईल याची नोंद घ्यावी.

८) जर excel sheet हे Microsoft Office 2003 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

क) Navigate to 'Tools' tab > 'Macro' > 'Security'.

ख) Click on 'Security' option. A Security window will open.

   It will show you all the security levels that you can select for your macros.

ग) Select 'Low' Option - This setting allows all macros to run.

९)जर excel sheet हे Microsoft Office 2007 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

1) With an excel file opened click on the 'Office' button.

2) Click on 'Excel Options' (present at the bottom).

3) Select the 'Trust Center' > 'Trust Center Settings'.

4) Click on the 'Macro Settings'. Choose the security level for running macros.

5) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you open an excel file in security warning pop-up for enable macro, click > Option

2) Select Enable Content and press OK

१०)जर excel sheet हे Microsoft Office  2010 आणि 2013 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

1) Open a Microsoft Excel file, and navigate to 'File' > 'Options' > 'Trust Center'.

   Click 'Trust Center Settings'

2) Select the 'Macro Settings' option.

3) Choose the security setting that you want to be applicable on macro execution.

4) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you opening an excel file their is one security warning pop-up for enabable macro,

   click > Enable Content

2) Then select Eanble Content and press OK

After opening the excel file you will get 'Visual Form' for student data entry.

Form will have button as 'Insert','Update' and 'Delete'

 आता आपण Microsoft Office  2007 मध्ये काम करून सर्व माहिती सविस्तर समजून घेऊ.सर्वप्रथम download केलेल्या file ला open कसे करायचे ते पाहू.file ला open EXCEL  प्रकारात open करावे. या स्क्रीन च्या वरच्या बाजूला “Security Warning : Macros have been disabled ” अशा वार्निंगचा मेसेज दिसून येईल.त्या समोर असलेल्या option या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.या स्क्रीन वर आपणास security Alert-macro असे page दिसून येईल.या page वर enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक करा.

११)  enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक करा;या स्क्रीन मध्ये असलेल्या तीनही tab बाबत खालील माहिती वाचा.

*Insert* : या tab मधून आपणास नविन विध्यार्थी system मध्ये भरावयाचा आहे.

*update* : या tab मध्ये आपणास या वर्षी माहिती भरल्यानंतर असे लक्षात आले की आपली भरलेली माहिती चुकलेली आहे अशा आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करता येऊ शकेल.

*Delete* : या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.

*Insert*  या बटनावर क्लिक करून नवीन विद्यार्थ्याची माहिती भरणे  

आपण insert या बटनाला क्लीक करावे.त्यानंतर आपणासमोर खालील प्रमाणे एक स्क्रीन दिसून येईल.आता आपण सविस्तररीत्या सदर माहिती कशी भरावी हे पाहू.विद्यार्थ्याची माहिती भरताना कोणत्या ऑप्शन मध्ये काय भरावे हे समजून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

*Name of student* : या ऑप्शन मध्ये आपण विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहावे.सुरवातीला first name मध्ये विद्यार्थ्याचे पहिले नाव नंतर second name  मध्ये वडिलांचे आणि last name मध्ये आडनाव असे लिहावे.एखाद्या मुलाचे नाव जर तीन फील्ड पेक्षा अधिक मोठे असेल तर  उदा. 'मोहम्मद युसूफ मोहम्मद कादरी सय्यद' असे असेल तर first name मध्ये मोहम्मद युसूफ असे लिहावे,second name मध्ये मोहम्मद कादरी असे लिहून last name मध्ये सय्यद असे लिहावे.

*Date of birth* : यामध्ये शाळेच्या  जनरल रजिस्टर मध्ये असलेली मुलाची जन्मतारीख  लिहावी.

*Gender* : यामध्ये विद्यार्थ्याचे gender नमूद करावे.

*Mothers name* : यामध्ये विद्यार्थ्याच्या आईचे संपूर्ण नाव लिहावे.

*UID* : जर विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असेल तर yes हा ऑप्शन निवडावा अथवा no असा ऑप्शन निवडावा.yes हा ऑप्शन  निवडल्यावर त्या समोरच्या रकान्यात आधार नंबर भरावा.आधार नंबर भरताना अंकाच्या मध्ये जागा न सोडता सलग भरावे.UID नसेल तर आधार कार्ड नोंदणी क्रमांक भरावयाचा नाही आहे हे लक्षात घ्यावे.अन्यथा आपली माहिती स्वीकारली जाणार नाही.

*General register number* : यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर नमूद करावा.हा नमूद करताना फक्त अंक भरावे.यामध्ये कोणत्याही अक्षराचा समावेश करू नये.

*Date of admission* : यामध्ये विद्यार्थ्याची शाळेत  प्रवेश घेतल्याची तारीख नमूद करावी.

*Initial admition standard* : यामध्ये विद्यार्थ्याची आपल्या शाळेत ज्या वर्गात  प्रवेश घेतला आहे ती इयत्ता नमूद करावी.

*Admission type* : यामध्ये विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेशाचा प्रकार निवडावा.

*Current standard* : या मध्ये विद्यार्थ्याची सध्या ज्या वर्गात शिकत आहे ती इयत्ता भरावी.

*Stream* : या मध्ये 11 वी आणि 12 वी च्या मुलांसाठी शाखा निवडावी.उदा. कला, वाणिज्य, विज्ञान

*Division*-: या मध्ये विद्यार्थ्याची तुकडी नमूद करावी.

*Medium* : या ऑप्शन मध्ये विध्यार्थी ज्या माध्यमात शिकत असेल ते माध्यम निवडावे.जर आपल्या शाळेला लागू नसलेले माध्यम आपण निवडले तर सदर माहिती स्वीकारली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.

*Semi english* : या मध्ये विध्यार्थी semi english मध्ये शिकत असेल तर yes भरावे अन्यथा no भरावे.

*RELIGION* : या मध्ये विध्यार्थ्यांचा धर्म कोणता आहे ते dropdown लिस्ट मधून निवडून लिहावे.

*category* : या मध्ये विध्यार्थ्यांच्या जातीची category कोणती आहे ती लिहावी.

*BPL* : यामध्ये विद्यार्थी दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर yes हा option निवडावा आठवा No.

*Ade Provided By Government* : या मध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत अथवा दिल्या जाणार आहे त्याविषयी माहिती भरावी.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

ही सर्व माहिती भरल्यावर स्क्रीन च्या खाली save या बटनावर क्लीक करावे.save या बटनावर क्लीक केले की Record inserted successfully असा मेसेज स्क्रीन वर दिसून येईल म्हणजे आता आपण भरलेली माहिती excel शीट मध्ये नोंद झालेली दिसून येईल.अशा प्रकारे सर्व मुलांची माहिती आपण भरून घ्यायची आहे.वर्गातील सर्व मुलांची माहिती अशा प्रकारे insert ऑप्शन मधून भरावी.आणि excel शीट तयार करावी. 

♦ *Update*♦

या tab मध्ये आपणास या आधी माहिती भरलेल्या मुलाची माहिती चुकली होती आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करावयाची आहे. आपण भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर ती update करण्यासाठी आपण खालील स्क्रीन मधील update या बटनावर क्लिक करावी आणि विद्यार्थ्याच्या जनरल रजिस्टर नंबरवर क्लिक करावे.update या बटनावर क्लिक करावे.

रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास त्या विद्यार्थ्यांची यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा सदर फॉर्म मध्ये भरलेली दिसून येईल.आता आपण या फॉर्म मधील माहिती पुन्हा एकदा नव्याने update करून घ्यावी.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की या माहितीमध्ये जनरल रजिस्टर मात्र update करता येणार नाही.अशा परिस्थितीत जर आपला जनरल रजिस्टर नंबर चुकला असेल तर सदर माहिती आपणास update करता येणार नाही म्हणून ती माहती आपण delete या बटणाने delete करावी.आणि पुन्हा नव्याने त्या मुलाची माहिती insert  या बटनाला क्लिक करून भरावी.विद्यार्थी माहिती delete कशी करावी हे सविस्तरपणे खाली सांगितलेले आहे.यासाठी आपण माहिती भरताना जनरल रजिस्टर नंबर चुकणार नाही याची काळजी घ्यावी.

रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास यापूर्वी भरलेली माहिती update च्या FORM  मध्ये दिसून येईल.सर्व माहिती update झाल्यावर शेवटी save या बटनावर क्लिक करावे.यानंतर आपणास RECORD UPADTE SUCCESFULLY असा message दिसून येईल.म्हणजे आपण सदर विद्यार्थ्याची माहिती व्यवस्थितरीत्या update केली असे समजावे.

♦ *Delete*♦

या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.अभ्यासासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करा.विद्यार्थी माहिती delete करण्यासाठी delete या बटनावर क्लिक करा.

स्क्रीन मधील delete या बटनावर क्लिक केल्यावर आपणास आपणास एक  फॉर्म हा स्क्रीन वर पहावयास मिळेल.delete च्या वरील form मध्ये आपण सर्वप्रथम रजिस्टर नंबर select करावे. स्क्रीन मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती आपणास delete करावयाची असेल अशा मुलाचा जनरल रजिस्टर नंबर select करावा.जनरल रजिस्टर टाकल्यावर आपणास त्या विद्यार्थ्याची माहिती सदर फॉर्म मध्ये दिसून येईल.या माहितीच्या वरती आपणास delete हे बटन दिसेल त्या बटनावर क्लीक करावे.म्हणजे त्या विद्यार्थ्याची माहिती delete होईल आणि तशी सुचना देखील आपणास स्क्रीन वर पहायला मिळेल.अशा प्रकारे insert,update आणि delete या बटनाचा उपयोग करून आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.एकदा एका वर्गाची सर्व मुलांची माहिती भरून झाली की QUIT या tab वर select करावे.QUIT या tab ला select केल्यावर आपणास आपण भरलेल्या विद्यार्थ्याची माहितीची excel शीट दिसून येईल.त्या शीट ला आपणास .csv या format मध्ये save करायचे आहे.यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे save as या बटनावर क्लिक करावे आणि त्यानंतर other format या tab वर क्लिक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.other format या tab वर क्लिक केल्यावर आपणास एक स्क्रीन दिसुन येईल.

सदर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे आपणास सदर file चे नाव बदल करावयाचे नाही आहे.परंतु सदर file चा save as type हा CSV(Comma delimited (*.csv) या format मध्ये निवडून घ्यायचा आहे हे लक्षात घ्यावे.

यानंतर आपण सदर file save करून घ्यावी.

आता आपण भरलेल्या मुलांच्या माहतीची excel शीट ही CSV(Comma delimited (*.csv) या format मध्ये save केलेली आहे.

यानंतर आपणास ही csv file ही upload कशी करावी हे पाहू.

माहिती upload करण्यासाठी आपण सर्वप्रथम मुख्याध्यापक यांनी आपले excel या tab ला क्लिक करून त्यानंतर upload personal या tab ला क्लिक करावे.

upload personal या tab ला क्लिक केल्यावर आपणास एक  स्क्रीन दिसेल.

त्या स्क्रीन मध्ये आपणास select file या बटनाच्या समोर असणऱ्या browse या tab वर क्लिक करावे.आणि आपण save as केलेली CSV(Comma delimited (*.csv) या प्रकाराची file जी आपण या आधी तयार केलेली आहे ती येथे select करावी.

स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या uplaod-step 1  या option ला क्लिक करावे.आता आपण या आधी तयार केलेल्या CSV(Comma delimited (*.csv) या प्रकारच्या file मध्ये काही error आहे का हे system द्वारे चेक केली जाईल.या प्रोसेस साठी काही मिनिटे देखील लागू शकतील.त्यासाठी आपण काही काळ वाट पहावी.

ही प्रक्रिया संपल्यावर आपणास upload-step 1 is completed.please click on upload step– 2 असा संदेश दिसून येईल.

upload-step 1 is completed.please click on upload – 2 या message ला ok करावे.

अशा प्रकारे आपणास आता स्क्रीन वर आपण माहिती भरलेल्या विद्यार्थ्याची लिस्ट दिसून येईल.आता या स्क्रीन वरील upload-step 2 या बटनावर क्लिक करा.क्लिक केल्यावर प्रोसेस होण्यासासाठी पुन्हा एकदा काही मिनिटे वेळ लागू शकेल हे लक्षात घ्यावे.त्यामुळे या step ला आपण थोडा वेळ वाट पहावी.काही वेळानंतर प्रोसेस पूर्ण झाली की स्क्रीन वर data uploaded successfully असा message येईल.

अशा प्रकारे ज्या एका वर्गाची माहिती आपण upload केली आहे ती यशस्वीरीत्या upload झालेली आहे असे समजावे.तसे status मध्ये देखील विद्यार्थ्याच्या नावासमोर accepted ही notification दिसून येते.म्हणजे आपण असे समाजावे की विद्यार्थ्याची माहिती ही system मध्ये upload झालेली आहे.अशा प्रकारे आपण नविन विद्यार्थ्याची किंवा मागील वर्षी ज्या मुलांची माहिती भरली गेली नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे.आपण यावर्षी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Report मधील HM Level मध्ये जाऊन Personal Details Checklist – PDF या tab ला select करुन सदर वर्गाची आणि विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत add झालेली पाहू शकाल याची नोंद घ्यावी.Personal Details Checklist – PDF या tab ला select केल्यावर आपणास इयत्ता १ ली च्या मुलांची pdf  मध्ये माहिती दिसून येते.अशीच माहिती आपणास Personal Details Checklist – excel ला देखील दिसून येईल.

Personal Details Checklist – PDF आणि Personal Details Checklist – excel या tab मध्ये जेंव्हा वरील माहिती प्रमाणे आपल्या शाळेच्या मुलांची माहिती दिसून येईल तेंव्हा खऱ्या अर्थाने आपल्या शाळेतील नविन विद्यार्थी add करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे

👉महत्वाचे : 

1)आपणास वरील महितीसाठीचे *manual* download करण्यासाठी http://goo.gl/qikIvJ या लिंक ला क्लिक करा.

२) *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : 
http://goo.gl/7lSj8b

3)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.
*समस्या कळवण्यासाठीची लिंक* :

http://goo.gl/9vBAQ8

4)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 5) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल : 
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा 
c)support.education@maharashtra.gov.in   

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com

Blog: havelieducation.blogspot.in

No comments: