शिक्षक मित्रहो .....
whatsapp चे भरपूर ग्रुप झालेत.त्याच त्याच माहित्या भरपूर येतात . डिलीट करायला सुद्दा खूप वेळ जातो .त्यामुळे होते काय की मोबाईल ची मेमरी लवकर फुल होते .मोबाईल slow होणे speed कमी होणे hang होणे हे problem सुरु होतात .त्यामुळे आपल्याला सर्व माहिती all डिलीट व क्लिअर करावी लागते .आपण इमेज व व्हिडिओ सेव्ह करूनआपल्या camputar ला किंवा laptop ला घेऊ शकतो .पण महत्त्वाच्या शाब्दिक माहिती/ मेसेज चे काय ???
याला एक सोपा पर्याय आहे. आपण अती महत्त्वाची माहिती facebook च्या माध्यमातून दीर्घ कालावधीसाठी जतन करू शकतो .यासाठी खालील पद्धतीने क्रुती करावी .
१) प्रथम facebook वर एक group तयार करावा .तयार करताना सेटिंग मध्ये फक्त फ्रेंड(सिक्रेट ) ला दिसेल असे करावे .पण त्या group मध्ये फक्त १ किंवा २ घरचे /जवळचे वक्ती घ्यावे .इतर कोणालाही घेऊ नये .ग्रुप तयार झाल्यावर त्या १ व २ जनाना remove करावे .म्हणजे group मध्ये आपण एकटे च राहू .भविष्यात कोणालाही घेऊ नाये . म्हणजे माहिती आपल्याला एकट्यालाच दिसेल .
२) whatsapp वरील महत्त्वाची माहिती copy करावी .व बाहेर पडावे
३) पुन्हा facebook चा group ओपन करावा व त्याच्यावर माहिती पेस्ट करुन शेअर करावी .
४) अशा पद्धतीने आपण दीर्घ कालावधी साठी माहिती जतन करू शकतो .ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण group ओपन करून माहिती बघू शकतो .ती माहिती कोणालाच दिसणार नाही .
५) आपण facebook च्या page ला किंवा आपल्या वा मित्रा च्या प्रोफाईल वर देखील हि माहिती टाकू शकतो .तसेच वेगळ्या नावाने PROFILE काढून देखील माहिती त्यावर टाकू शकतो .पण ही माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असते . शक्यतो असे करू नये .
६) या शिवाय आणखी दोन तीन पर्याय आहेत .पण सर्वात सोपा व जवळचा पर्याय म्हणजे facebook .एकदा करून पहा व काय होते ते मला सांगा .मी असेच करतो .माझ्या मोबाईल मध्ये 500 group आहेत .दिवसभर जवळजवळ ५ ते १० हजार मेसेज येतात .त्यामुळे मला दर २-३ दिवसांनी all delete / clear करावे लागते . सोपे आहे .नक्की करून बघा .
धन्यवाद ......
5 comments:
छान idea आहे सर मी सध्या असेच पण telegram var gheun करतो
छान idea आहे.नक्की करणार.
धन्यवाद सर
Nice Idea sir
very nice ..
me aliso doing this.....
one other way is Gmail..
we can mail imp data to our own mail.
Ravi Deshmukh
Mo.No.09527040200
Post a Comment