मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय कसा शोधावा ? GR search ?

"कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा  "

नमस्कार शिक्षकमित्रहो  ,
                 शासननिर्णय शोधणे  सोपे आहे  .आपण महाराष्ट्र शासनाच्या GR वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच  शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ दिनांकाचा व तसेच कही  माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही  GR .लगेच शोधु शकतो.


महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा .या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या   खालीलप्रमाणे .

१. प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा  किंवा आपण थेट शासन निर्णयाच्या लिंक वर थेट जावू शकता.   https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

२. या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते .

३. शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे  पेज ओपन होते .
यावर आपल्याला खालील बाजूला GR विषय दिसतात व वर इतर मेनू दिसतात . प्रत्येक GR च्या पुढे  डाउनलोड TAB  ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो .

शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख  :

  •  विभाग -  आपणास हवा तो विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR  शोधू शकतो. त्यावेळी त्याच विभागाचे GR आपणास दिसतील . यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत .
  • महत्वाचा शब्द -    यामध्ये शोधायच्या GR  मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो . त्यावेळी त्या त्या शब्दाच्या रिलेटेड GR आपणास दिसतील . आपण पेज नंबर नुसार मागे पुढे जावू शकतो.
  • दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून  " शोधा " या बटनावर क्लिक  करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल . या ठिकाणी आपण ठराविक कालावधीतील  दिनांक टाकून देखील त्या त्या कालावधीतील Gr शोधू शकतो .
  • सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो . 
  • GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी . एकेका पेज वर साधारण १० शासन निर्णय असतात . पेज नंबर नुसार आपण मागे व पुढे जावू शकतो .
  • आपण त्या त्या पेज नंबर ला click करून  मागे मागे किंवा पुढे पुढे देखील जावू शकतो  तसेच चौकटीत ठराविक पेज नंबर टाकून थेट त्या पेज वर देखील पोहोचू शकतो .

धन्यवाद



6 comments:

Unknown said...

Thank for this easy infoemation

test said...

ok

Unknown said...

Nice Information and it's really helpful for us
thank you very much

Devendra Ravishankar Hattimare said...

👌 👌 👌 👌

Unknown said...

Very useful information

Sardar Kumbhar sir said...

Nice