मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Sunday 23 August 2015

मोबाईल च्या माध्यमातून कागदपत्रे  स्कॅन( १ mb साईज ) कसे करावे


मित्रहो आपल्याला सरळ प्रणालीमध्ये आपली कागदपत्रे स्कॅन करावयाची आहे.आपण खालील  पद्धती चा वापर करून  १ MB साईज  मध्ये स्मार्ट  मोबाईल वर स्कॅन करू शकतो एकदम मोफत.....
.
१)प्रथम आपण प्ले स्टोअर वरून   camscanner  हे APPS घ्या (.इतर ही घेऊ शकता .)
२) आपल्या मोबाईल वरून आपल्या सर्व  लागणार्या कागद पत्रांचा फोटो काढा .फोटो काढताना तो क्लिअर यईल अशी काळजी घ्या .शक्यतो ५ MP कॅमेरा ने काढा म्हणजे १ mb साईज मध्ये येईल .जर कमी MP चा असेल ते क्लीअर येणार नाही  ,व ८  MP  चा असेल तर आपल्याला  CROP चा पर्याय आहे, लांबून फोटो काढा व कडेचा भाग  crop ( कट )करा  .१३ MP चे सांगता येत नाही .
३) हे फोटो  camscanner मध्ये घेऊन स्कॅन करा .व सेव करा.सेव करताना  JPG image सेव करा . पुन्हा मोबाईल वरून pc ला किंवा laptop ला घेऊ शकता .अगदी मोफत ......
आणखी दोन तीन पर्याय आहेत .पण हा सोपा व जवळचा  पर्यायआहे. 
धन्यवाद ....
   मित्रहो .....
           आपल्याला सरल प्रणाली( शाळा पोर्टल ) मध्ये १ ते ८ चे  वेळा पत्रक  भरावयाचे आहे .पण काय होते काही वेळा सर्व विषय भरूनही सेव  होत नाही. वेळापत्रक बघून भरल्यामुळे तासिका चुकण्याची शक्यता असते .काहीवेळा आपल्याकडे उपलब्ध असलेले वेळापत्रक चुकीचे असण्याची शक्यता असते . त्यामुळे एरर दाखवते .खालील गोष्टी लक्षात घेतल्या तर वेळापत्रक लगेच भरले जातात .कारण एका विषयाची संख्या जरी चुकली तर माहिती सेव होत नाही .
१) फक्त तासिका तक्ता हातात घ्या.सर्व वर्गाची वेळापत्रके घेऊ नका  (.ईयत्ता निहाय व विषय निहाय अभ्यासक्रम २०१२ चा ५० तासिका तक्ता  )
२)उदा पहिली ला ५० तासिकेमध्ये १८ मराठी ,इंग्रजी ६,गणित १२ कला ४,कार्यानुभव ५,शा.शिक्षण ५ अशा तासिका आहेत .
३)१८ मराठी तासिका सोमवार ते शनिवार अशा सलग आडव्या क्रमाने भरायच्या .त्यानंतर बाकीचे विषय घ्यायचे आडव्या क्रमाने पण मोजून बरोबर द्यायचे .मात्र शनिवारी पहिला तास शा शिक्षण चा घ्या . त्या बदल्य्यात खाली मराठी घ्या( बदल करा ) .
४)या पद्धतीने इतर इयत्ता ची वेळापत्रके भरून घ्या .त्यामुळे वेळापत्रके पटकन भरली जातात .व वेळ वाचतो .या मध्ये विद्यार्थ्याची मानसिकतेचा विचार  करून आपण थोडाफार बदल ही करु  शकता  .
(हे माझे वैयक्तिक मत व अनुभव आहे. आपण आपल्या स्तरावर बदल करू शकता .)
धन्यवाद

Friday 17 July 2015

 . whats App /hike  वरील महत्त्वाची शाब्दिक माहिती/मेसेज  कायम स्वरूपी जतन करणे .
.


          शिक्षक मित्रहो .....
                                    whatsapp  चे भरपूर  ग्रुप झालेत.त्याच त्याच माहित्या भरपूर येतात . डिलीट करायला सुद्दा खूप वेळ जातो .त्यामुळे होते काय की मोबाईल ची मेमरी लवकर फुल होते .मोबाईल slow होणे speed कमी होणे hang होणे हे problem सुरु होतात .त्यामुळे आपल्याला सर्व माहिती all  डिलीट व क्लिअर करावी  लागते .आपण  इमेज व व्हिडिओ सेव्ह करूनआपल्या camputar ला किंवा laptop  ला घेऊ शकतो .पण महत्त्वाच्या शाब्दिक माहिती/ मेसेज चे काय ???
                                   याला एक सोपा  पर्याय आहे.  आपण अती महत्त्वाची  माहिती facebook च्या माध्यमातून दीर्घ कालावधीसाठी जतन करू शकतो .यासाठी खालील पद्धतीने क्रुती  करावी .

१) प्रथम facebook वर एक group तयार करावा .तयार करताना सेटिंग मध्ये फक्त फ्रेंड ला दिसेल असे करावे .पण त्या group मध्ये  फक्त १ किंवा २ घरचे /जवळचे वक्ती घ्यावे .इतर कोणालाही घेऊ नये .ग्रुप तयार झाल्यावर त्या १ व २ जनाना remove करावे .म्हणजे group मध्ये आपण एकटे च राहू .भविष्यात कोणालाही घेऊ नाये . म्हणजे माहिती आपल्याला एकट्यालाच दिसेल .
२) whatsapp  वरील महत्त्वाची  माहिती copy करावी .व बाहेर पडावे
३) पुन्हा facebook चा group ओपन करावा व त्याच्यावर  माहिती पेस्ट करुन  शेअर करावी  .
४) अशा पद्धतीने आपण दीर्घ कालावधी साठी माहिती जतन करू शकतो .ज्यावेळेस आपल्याला गरज  असेल त्यावेळेस आपण group ओपन करून माहिती बघू शकतो .ती माहिती कोणालाच दिसणार नाही .
५) आपण facebook च्या page ला किंवा आपल्या वा मित्रा च्या प्रोफाईल वर देखील हि माहिती टाकू शकतो .तसेच वेगळ्या नावाने PROFILE काढून देखील माहिती त्यावर टाकू शकतो .पण ही माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असते . शक्यतो असे करू नये .
६) या शिवाय आणखी दोन तीन पर्याय आहेत .पण सर्वात  सोपा व जवळचा पर्याय म्हणजे facebook .एकदा करून पहा व काय होते ते मला सांगा .मी असेच करतो .माझ्या मोबाईल मध्ये 150 group आहेत .दिवसभर जवळजवळ ५ ते १० हजार मेसेज येतात .त्यामुळे मला दर २ दिवसांनी all delete / clear करावे लागते . सोपे आहे .नक्की करून बघा .

धन्यवाद ......
४ थी व ७ वी शिष्यवृत्ती चा फायनल निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा.


येथे क्लिक करा



इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे  (ignou) बीएड चे  माहितीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली करा.



येथे क्लिक करा


Thursday 16 July 2015


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा .


  Result पाहण्यासाठी येथे क्लिक करा 









Saturday 11 July 2015

  शाळा ,विद्यार्थी शिक्षक डाटाबेस (सरल प्रणाली)

                  शाळा ,विद्यार्थी शिक्षक डाटाबेस (सरल प्रणाली) मध्ये आपल्याला शाळा ,शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती भरावी लागते .सुरवातीला शाळेची माहिती भरावी लागते .त्यानंतरच शिक्षक व  विद्यार्थी माहिती ओपन होईल . सर्व माहिती कच्च्या नमुन्यात भरूनच वेबसाईट वर भरणे योग्य होईल .
                  वेब वर महिती भरताना User ID हा तुमचा डायस कोड असेल व पासवर्ड हा तुमच्या कडे आगोदर दिलेला आहे .तो सापडत नसेल तर forget password वर क्लिक केल्यास तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांक वर पासवर्ड चा sms येईल .जर आला नाही तर तुमच्या केंद्र प्रमुखाला पासवर्ड रिसेट करायला सांगा .


शाळेची माहिती भरण्या साठी खाली क्लिक करा .


https://education.maharashtra.gov.in/


यासंदर्भातअधिक  माहिती  मिळवण्यासाठी आपण श्री  नितीन रोहाकले यांच्या  
mahazpschool या ब्लौग वरील माहिती कशी भारावी या संदर्भात व्हिडिओ कच्चा नमुना व इतर महत्त्वाची माहिती  खाली क्लिक करून पाहू शकता


डाटा बेस माहिती साठी येथे क्लिक करा . 

आधारकार्ड  मतदान ओळखपत्राशी लिंक करणे

          आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी आपण खालील प्रकारचा SMS आपण पाठवून लिंक करू शकतो .

ECILINK<SPEACE>मतदान ओळखपत्र क्रमांक<SPEACE>आधार क्रमांक

उदा .  ECILINK DR3245657 3456435467545

असा SMS तुम्ही ५१९६९  ला पाठवा .आपणाला रजिस्ट्रेशन चा SMS येईल .

किंवा खालील लिंक वर क्लिक करून देखील आपण लिंक करू शकता .



आधारकार्ड लिंक साठी येथे क्लिक करा


Friday 8 May 2015

"कोणताही शासननिर्णय ( GR ) शोधा /मिळवा फक्त 5 मिनीटात "

नमस्कार मित्रानो ,
                 शासननिर्णय शोधणे  झाले सोपे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय gr फक्त 5 ते 10 मिनीटात शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ  चा व तसेच कही  माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही  gr 5 ते 10 मि .लगेच शोधु शकतो .यासाठी कोणती वेबसाईट ,apps आहे .pdf फाईल convert कशी करायची व gr बाबतीत ईतर सखोल माहीती व तंत्र मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहेच .
कोणत्याही gr साठी संपर्क करा प्रदिप कुंभार .पाटण .जि .सातारा 9404192628
    धन्यवाद ....
           
                   

Tuesday 28 April 2015

हाय मित्रानो
     मी हा ब्लॉग  पहिल्यांदा च बनविला आहे .कोणाचेही मार्गदर्शन न घेता .त्यामुळे या मधे काही तृटी राहण्याची शक्यता आहे .मी हा किंवा दुसरा ब्लॉग बनविन तो चांगला करन्याचा प्रयत्न करीन .सध्या मी दररोज whatsapp var शैक्षणिक माहिती ,gr ,news post करण्याचा प्रयत्न करतो .त्यामुळे ब्लॉग कडे लक्ष दिले नाही .मी सध्या महाराष्ट्रातील जवळजवळ 100 गृप वर शैक्षणिक माहिती ची देवाण घेवाण करतो आहे आपल्या आशिर्वादामुळे .सद्या ब्लॉग भरपुर निघालेत .पण मला वाटते whatsapp च जास्त तळागाळातिल शिक्षकांकडे पोहोचले आहे .म्हणुन च मी गेल्यावर्षी  ब्लॉग चा विचार सोडला .असुद्या आपण अधुन मधुन भेटत राहु ....धन्यवाद ..
  आपला
           प्रदिप कुंभार